NiKi

NiKi

Monday, December 24, 2012



उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत...

... एकमेका आठवायला...
आणि आठवणी जपण्याला,
प्रेम म्हणायचं असत....

थोडस झुरण्याला,
स्वतःच न उरण्याला,
प्रेम म्हणायचं असत...

भविष्याची स्वप्न रंगवत,
आज आनंदात जगण्याला,
प्रेम म्हणायचं असत...

कितीही रागावल तरी,
एकमेका सावरायला,
प्रेम म्हणायचं असत...

शब्दातून बरसायला,
स्पर्शाने धुंद होण्याला,
प्रेम म्हणायचं असत...

तुझ माझ अस न राहता,
'आपल' म्हणून जगायला,
प्रेम म्हणायचं असत........






No comments:

Post a Comment