नयन तुझ्या भेटीसाठी
आता सारखेच तरसतात
कुणी बर समजावेल त्यांना
अश्रू माझे पावसासारखे बरसतात
तुझ्या सहवासात प्रत्येक क्षण
रणरणत्या उन्हातही चमकतात
तेव्हाचे ते रोमांचकारी क्षण
पुन्हा पुन्हा आठवतात
माळरानात एकटी बसून
तुझीच वाट पाहत आहे
कधीतरी मागे वळून पाहशील
अजूनही अशीच समजूत काढत आहे
No comments:
Post a Comment