NiKi

NiKi

Friday, December 28, 2012

मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......!


तुझ्यासाठी मी क्षणक्षण झुरतो,
कारण मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो....

रुसतो, रागावतो, हट्टहि करतो
अन
कुणी मनविनार नाही हे माहित असूनही कुणीतरी मनवेल हि वेडी आशा मनात धरतो .....

कारण मी .......


खूप सोसलं, सोसतोय
अन
तुलाही सोसाव लागू नये म्हणून जीवापाड प्रयत्न करतो...

कारण मी....

नासमज मी पण समजदार तू,
खरंच
मी तुझ्या मनाला, प्रेमाला किती समजतो......?

पण खरंच मि ........

तुझी, तुझीच
अन
फक्त तुझ्याचसाठी अर्पण हि कविता करतो..


कारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ......
कारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो .....

No comments:

Post a Comment