NiKi

NiKi

Friday, December 28, 2012

माझ्या कविता जीच्या भोवती घोटाळतात
विषय काहीही असो पण नेहमी जीचे गुण गातात
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!१!!

स्वप्ने पाहून वास्तवात जगण्यास शिकविले
ती ती म्हणजे कोणी अप्सरा नाही कुणी मेनका नाही
जिला देण्यास उपमाच नाही
अशीच आहे ती माझ्यासाठी खुप काही
जिने मला दुखात असतानाही हसण्यास शिकविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!२!!

माझे अस्तित्व.. कुठे होते काही माझे अस्तित्व
अस्तित्व म्हणजे काय असते??
अस्तित्व म्हणजे काय असते
हे दाखवून ते जपण्यास शिकविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!३!!

आधी पाऊस पडायचा थंडीही लागायची
मैत्री व्हायची अन नातीही वाढायची
पण त्यात खास भावना नव्हत्या
नाती कशी जपायची
नात्यांसाठी कसे जगायचे हे जिने मला शिकविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!४!!

दुसर्यांसाठी धडपडणे
सतत काही न काही चांगले करणे
हेच जिच्या सहवासातून मी अनुभविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!५!!

जिने माणुसकी काय असते
हे मला वास्तवात दाखविले
आणि माणूस म्हणून जगतान
खरोखरच माणूस बनविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!६!!

कोणीही करू शकले नाही
कोणालाही जमले नाही
असे सर्वांवरच प्रेम करण्यास शिकविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!७!!

हे सर्व करून ती मात्र वेगळीच राहिली
कसलीही अपेक्षा न ठेवता नामनिराळी झाली
आपल्या सुंदर सहवासाने
जिने माझे आयुष्य सजविले
ती ती म्हणजे तीच
जिने मला कवी बनविले....!!८!!

No comments:

Post a Comment