NiKi

Friday, December 28, 2012
भविष्य आपले सजविण्यात,
होतेस पुरी वेडिपीसी.
वेडा करी सहवास तुझा,
तुझ्या निखिल डोळ्यानिशी.
तुझ्या हसण्यातून उमटे,
प्रसन्न प्रभा उद्याची.
आणि तुझा स्पर्श छेडी,
तार तार काळजाची.
हात जरी हातात घेतेस,
तरी एक पूल पुढे जरासी.
स्वप्न स्वप्न पेरतो,
एक एक शब्द तुझा.
यातून उगवेल सुख,
विश्वास ना याहून दुजा.
भावनेनी भरलेली,
कल्पांकीत तू इतुकी कशी.
शोकांतिका सरते सारी,
तुझे डोळे पाहता.
तुझ्या वाटेवरून चालता,
गवसे सुख पुर्तिका.
विसावा तुझ्या पापण्यांत,
भेटे मायेची माय जशी.
पाणीदार डोळ्यात तुझ्या,
मद्य भरलेली नशा.
तू सांगशील ती वाट माझी,
तू दाखवशील ती दिशा.
पांगळ्याला जशी काठी,
माझ्या साठी तुही तशी.
आयुष्याचे सारे इमले,
तुझ्या मुठीने बांधायचे.
या पुढले क्षण सारे,
दिल्या वचना जागायचे.
सजवूया आयुष्य सारे,
जसे समजावून तू रेखीशी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment