NiKi

NiKi

Monday, December 24, 2012

हळूच अशीच अचानक ती
वाऱ्याची झुळूक येऊन गेली
प्रेमाची हि नाजूक स्वप्ने
मनात अलगद ठेऊन गेली

शब्दांचे माझे कधीच नव्हते नाते
एकांतही सदैव मला परकाच भासे
काय जणू अशी जादू ती झाली
शब्द अन एकांतातही फक्त तूच मला दिसे

... होते मी आशीच अवखळ खट्याळ एक
नव्हते न कधीच काही भान जगाचे ते
हळूच एके दिस अचानक आलास तू
क्षणात माझे विश्व तुझ्यात सामावले जणू

शब्दांच्या विळख्यात मला अडकवत तू गेलास
न पाहता हि जीवापाड प्रेम करत राहिला
हळूहळू का होईना प्रेमाची नाजूक फुले
माझ्या मनात हि तू पसरवूनी गेला

No comments:

Post a Comment