तू शिम्पिल्या चांदण्यांचा
उत्सव अजून चालतो मनी
तोच चंद्र तेच तारे
तीच सांज आजही रानी
तू असावं जवळ सखे
पाहताना धुंद रंग नभीचे
चितारताना पहाट उद्याची
तुही भरावे रंग गोजिरे
चांदणभरल्या आभाळातला
मी निवडावा एक तारा
शब्द शब्द गीतात उतरता
एक नवा तू सूर भरावा
तू असावं अन मी असावं
दोघांपलीकडे काहीच नुराव
चंद्र छेडता प्रेमराग मग
आभाळ अवघं हळूच हसावं
No comments:
Post a Comment