मनातल्या त्या ओळी
आज ऐकवून टाक
खोलवर दडलेल्या गोष्टी
रात्रभरात संपवून टाक
हवतर ,
नयनातुनच सारं काही सांगुन टाक
न लिहिलेल्या कविता
आज तू सुनवून टाक
मनातले ते बंदिस्त वाक्य
आज तू बोलून टाक
हवतर,
नयनातुनच सारं काही सांगुन टाक
तुझी एक नजर
मला सर्व काही सांगुन जाईल
व्याकुळलेली ही दोन मनं
कायमची एक होऊं जातील
बघ .... हवतर
नयनातुनच सारं काही सांगुन टाक
No comments:
Post a Comment