रात्र झाली असेन गडद काळोखी,
मिटली असतील फुले बागेतली,
पण ती मात्र जागीच असेन
पापण्या मिटुन हुंदके देत
... आणी त्या पापण्यांमधुन वाहत असतील चार शब्द
"माझे तुझ्यावर ’काही’ आहे" म्हणुन..
आणि मी देखील ईकडे अकंठ जागा
मनात झुरत..
उत्तर घेउन, तुझ्या प्रश्नाची वाट बघत..
रात्र होइल आणखीन गडद
आणि तुझ्या आसवांनी भरुन येईल माझ हॄदय
तुला आठवतील माझे ओझरते स्पर्श,
माझे तुझ्या कानाशी घुमणारे श्वास
मग सतावतील तुला, माझ्या कवितांचे भास
तु उठशील लगबगीने, फोन उचलायला
पण आताही हरलीसच तु,
आपल्या लटक्या खेळात हरायचीस तशी
त्या पुर्वीच माझा फोन येईल,
मग क्षणभर फक्त मौनच वाहील ईकडुन - तिकडे
आणी श्वासांचे कल्लोळ
आताही कवितेनेच वाचवले दोघांना
तु हसशील,
आणि पहिल्यांदाच अश्रु आनंदाने ओघळतील
"माझे तुझ्यावर ’काही’ आहे"
ह्यातल्या "काही"ची जागा प्रेमाने घेतली आहे
फोनवरच बिलगशील मीठीशी माझ्या
आणि "हो" म्हणशील.. अगदी मनापासुन..

No comments:
Post a Comment