कवितेच्या भूमिवर ...
झुकले आहे आभाळ गीताचे
अधरांच्या भूमिवर
सारंगीची छेडली तार
मनामध्ये किणकिणली
मृदुंगावर पडली थाप
रोमरोमांतून भिनली
प्रीत वारा डुलतो आहे
श्वासांच्या भूमिवर
नजरेतील मार्दवाने
सुमनालाहि लाजविले
एकाच दृष्टी क्षेपांत
भाव कथिले मनांतले
विसावले ते नेत्र आतां
पापण्यांच्या भूमिवर
हृदयाच्या धडधडीत
अमर सूर नाचूं लागले
अंतरी उमटले बोल
ओंठावर येऊ लागले
विखरून ते अखेर पडले
कवितेच्या भूमिवर ।।
No comments:
Post a Comment