आठवते सखये मला
रात्र पहिल्या भेटीची
पटली ओळख क्षणांत
मनांत लपल्या प्रीतिची ।
मिटले होते ओंठ जरी
नेत्र ते बोलत होते
अनेक शब्दांचे भाव
नजरेंत साठविले होते ।
चोरत्या तव स्पर्शाने
भाव कथिले मनांतले
जें अनेक शब्दांनीही
नसते सांगता आले ।
दूर दूर रहाणे तुझे
मनांत ठसत होते
माझ्या मनांस अनामिक
ओढ तें लावित होते ।
प्रीतिच्या त्या क्षणाने
हृदयीचे दार उघडले
अन जीवनांत अपुले
कायम ते मीलन झाले ।।
No comments:
Post a Comment