NiKi

NiKi

Friday, December 28, 2012

हवेच्या एका झोक्याने ...




हवेच्या एका झोक्याने
पुष्प गळून पडले होते
आळसावलेल्या जीवनांत
त्याची मनांत स्मृतिरेखा उठते ।
सभोंवताली चोहिंकडे
एकच प्रतिरूप दिसते
हृदयाच्या कोंपर्यांतून
असह्य अशी कळ उठते ।
भुरभुरणार्या पाऊसधारा
त्यांतही ती ऊब वाटते
आठवणीने उरल्यासुरल्या
वीज शरिरी सळसळते ।
मातीचा तो गंध अनोखा
त्यांतही स्मृति दाटून येते
सभोंवताली आहे सखी
भूल मनाला ती पडते।।

No comments:

Post a Comment