NiKi

Friday, December 28, 2012
आयुष्याच्या वळणावर मी एकाकी असताना
मला साद घातलीस
वयाची अंतरे त्यागून मनाचे भाव फक्त जाणलेस
म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!१!!
ह्या माझ्या रखरखीत जीवनाला
तुझ्या भावनिक स्पर्शाने परीस बनविलेस
म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!२!!
तु माझ्यासाठी खुप काही आहेस
मनाची उमेद आशेचा किरण
हि जाणीव करून दिलीस
म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!३!!
आडवाटेवर पडलेला दगड होते माझे जीवन
त्याला मूर्तिमंत आकार दिलास
उगाचच त्याला देवाचे नाव दिलेस
म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!४!!
माझ्या आयुष्यात येऊन खास ह्या शब्दाचा
नेमका अर्थ मला समजाउन मला खास बनविलेस
म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!५!!
कितीतरी आले अन कितीतरी गेले
त्या येण्यात अन जाण्यात कुठेही तु नव्हतीस
ती तु फक्त मला तूच दिलीस
म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!६!!
ज्यासाठी पूर्ण आयुष्य वाट पहिली
तुझ्या एका नजरेतून ते सारे काही दाखविलेस
म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!७!!
वर्षानुवर्ष दबलेल्या प्रेरणा आशा आकांक्षा कला
परत जागविल्यास...
आणि मला कवी बनविलेस
म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!८!!
मला माहित नाही हे सर्व काय आहे
जाणीव की मैत्री की प्रेम की माया की भावना
पण माझ्यासाठी हे सर्व...
फक्त तूच आहेस...
फक्त तूच आहेस...!!९!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment