मला तुझ्यासारख्या कविता नाही रचता येत
मनापासून नाही हसता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
मी फक्त तुझा आणि तु फक्त माझी आहेस...!!१!!
मला तुझ्यासारखे गाणे नाही गाता येत
हृदयाच्या अंतरंगात नाही जाता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
माझे हृदय तुझे अन तुझे हृदय हेच माझे हृदय आहे...!!२!!
मला तुझ्यासारखे डोळ्यात डोळे घालून नाही पहाता येत
तुझ्यासारखे नझर चोरून नाही जाता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
तुझी नझर माझ्यावर अन
माझ्या नाझारेत फक्त तूच आहेस...!!३!!
मला तुझ्यासारखे ढसाढसा नाही रडता येत
मनातले दुख नाही सांगता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
माझे सुख तुझे अन तुझे दुख माझे आहे...!!४!!
मला तुझ्यासारखे नेहमी आनंदी नाही राहता येत
सुखी संसाराचे स्वप्न नाही पाहता येत
तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे
तूच माझ्या जीवनाचे स्वप्न
आणि त्या स्वप्नात फक्त तूच आहेस...!!
No comments:
Post a Comment