NiKi

NiKi

Monday, December 24, 2012

एक साधा सुधा कवी
म्हाणून ओळख माझी नवी,
तुझ्यावर कवीता करून
आता भरली माझी वही.

तुझे ते हासु पाहून
डोळ्यांच्या पापण्या लवलवतात,
पाहतच राहील्यावर अपसुक
मला त्यावर कवीता सुचतात.

... तुझ्यावर कवीता करताना
शब्द पावसा सारखे पडतात,
मी फक्त त्याना रचना देतो
ते शब्द आपोआप जोडतात.

कवीता लीहीताना तुझ्या
मनातले जाणु पाहतो,
तुला जे आवडेल असच
मी तुझ्यावर लीहीतो.

तु माझ्या कवीतेला
कधीही साद देत नाही,
असे असुनही मी कधी
नीराश होत नाही.

तुझ्या त्या नाकारण्याने
मी कधीही दुःखी नसतो,
कारण त्यातुनच तर मी
माझा कवीतेचा छंद जोपासतो.

माहीत असते मला
तु मझी नक्की होशील,
माझ्या या ओसाड कवीतेला
कधीतरी साद तु देशील..

No comments:

Post a Comment