NiKi

NiKi

Sunday, December 30, 2012

तु लावलेले कवितेचे बीज
हळू हळू मोठे होतेय
तुझ्या विरहाच्या अश्रुने
खुप खुप बहरतेय
आता वेळ आलीय
त्याला फुले येण्याची
अशावेळी तु इथे नाहीस
हीच खंत आहे माझ्या मनाची
पहिला अंकुर आला तेव्हा
तु माझ्यासोबत होतीस
आता कळीची चाहूल लागता
तु कुठे गेलीस??
त्याचे प्रत्येक पान अन फुल
तुझीच वाट पाहतेय
कधीतरी होईल स्पर्श तुझा
म्हणून मनोमन शहारतेय
माझे काय
माझे पूर्ण जीवन मी
तुझ्यावरच वाहिले
तु गेल्यावर आता माझे
अस्तित्वाच नाही राहीले
कधी येणार तु
कधी ओंजळीत भरणार त्याला
आता वेळ लाऊ नकोस
त्याला न पाहता जाऊ नकोस
मला दुखविले तसे...
त्याला तरी दुखऊ नकोस
त्याला तरी दुखऊ नकोस...

No comments:

Post a Comment