तुझे चित्र हाच माझ्या चित्राचा विषय असतो
पण प्रत्यक्षात मात्र नेहमीच तो फसतो...
तुझे चित्र रेखाटताना फक्त तुलाच मी स्मरतो
तु स्मरणात आलीस की कागद मात्र कोराच उरतो...
तुला रेखाटताना तु समोर असावीस असे वाटते
सारेकाही बरोबर असूनही चित्र तुझे अपूर्णच वाटते....
कदाचित तुला कागदावर उतरविणे इतके सोपे नाही
तरीही तुला कैद करण्याचा व्यर्थ प्रयत्नात मी आहे...
तुझ्या चित्रात कुणास ठाऊक का मी माझेच प्रतिबिंब पाहतो
तुला कागदावर उतरवताना अलगद मनात हि उतरवू पाहतो...
तुझे चित्र कदाचित कधीच पूर्ण होणार नाही
आणि झालेच कधी तरी तुला दाखवण्यास मी तिथे उरणार नाही...
तुझे चित्र हे माझ्या आयुष्याचे अमूल्य रत्न असेल
पण खंत हि आहे की माझे आयुष्य वेचुनही त्या चित्रात
माझे कुठेही अस्तित्व नसेल
माझे कुठेही अस्तित्व नसेल...
No comments:
Post a Comment