NiKi

NiKi

Wednesday, January 2, 2013



पहाटेचा गार वारा
हळूच लाजवितो
एकांतातील त्या दोघांना
तसेच काहीसे माझे अंग
नखशीखान्त का शाहारावे
जेव्ह्वा तुझे गोड स्वर कानी पडावे...!!१!!

स्वर्गातल्या मंजुळ किंणकीणीसम
आहे त्यांचे अस्तित्व
अप्सरांसम आलिंगने त्यांची घडावी
हेच नेहमी का जाणवावे
जेव्ह्वा तुझे गोड स्वर कानी पडावे...!!२!!

झाला तुझ्या नाजुक
ओठांचा स्पर्श स्वप्नी जणू
जे जाणवले मनाला ते
कधीतरी सत्त्यात उतरावे
जेव्ह्वा तुझे गोड स्वर कानी पडावे...!!३!!

कधीकधी वाटते तुला ऐकतच रहावे
ऐकता ऐकता जगाला विसरावे
माझ्या मनाला हे स्वप्न
पुन्हा पुनः का पडावे
जेव्ह्वा तुझे गोड स्वर कानी पडावे...!!४!!

अस्तित्व तुझे त्या गंगेसारखे
स्पर्शून गेले माझ्या मानसागरा
आणि माझे हे जलासम जीवन
अमृतासम बनावे
जेव्ह्वा तुझे गोड स्वर कानी पडावे...!!५!!

No comments:

Post a Comment