NiKi

NiKi

Wednesday, January 9, 2013



मदन मस्त ह्या रंगीत तारका मज लाभल्या ,

तुझ्या सहवासातल्या ..

काजळ काळे नयनी सजले, हा असा गझब शृंगार केला ,

तुझ्या सहवासासाठी ..

सर्वांना झिडकारले , ना कुणाची केली पर्वा ,

तुझ्या सहवासासाठी ..

कशाची ना आवड उरली , मन हे निकामे झाले,

तुझ्या सहवासासाठी..

सर्व काही विसरून गेले , स्वतःलाही पारखी झाली,

तुझ्या सहवासासाठी..

सर्व काही केले तुजसाठी , कधी होता ना तु मजसाठी,

ना मज ह्याचे दुखं वाटे , तु कुठेही रहा ,

माझा देह ही अर्पण तुझ्या सुखासाठी ....................

No comments:

Post a Comment