का कळत नाही पण कधी-कधी काहीतरी वाटत असत
हे कधी-कधी वाटण म्हणजे नक्की काय असत ?
हे प्रेम असत का नुसताच वाटण असत
हे समजण खरच का हो इतक कठीण असत ?
का कोणीतरी अचानक इतका खास वाटू लागतो
कि मन फक्त त्याचाच विचार करत असत
सगळ्यांच्यात असूनही कुठेच नसतो आपण
सगळ्यांना सापडूनही हरवलेलो असतो आपण
ओठांवर जे हास्य असत
डोळ्यात त्याच रहस्य असत
आणि मनात त्याचच अस्तित्व असत
का कळत नाही पण कधी-कधी काहीतरी वाटत असत
No comments:
Post a Comment