गोड तुझ्या स्मृतिंने...
गोड तुझ्या स्मृतिंने
मन माझे ओथंबले
अन् नेत्रांतून अश्रुरूपे
ओसांडू ते लागले ।
मधूर तुझ्या स्वरांचे
गुंजारव कानीं उठले
अन स्वर बाकीचे
त्यामध्ये विरून गेले ।
आठवणींने तव स्पर्शाच्या
अंग अंग बहरले
अन् अचानक अंतरांत
तव स्मृतिंचे दिप उजळले ।
तव श्वास गंधाने
मोहरून मन गेले
तूं नाहीं जवळी म्हणूनि
पुन्हां ते उदास झाले ।
तव स्मृतिंने मनीं माझ्या
दीप अनंत पेटविले
अन् माझ्या तव मनाची
दाह ते करू लागले ।।
No comments:
Post a Comment