NiKi

NiKi

Tuesday, January 15, 2013

तुझ्या नजरेत भरलेल्या सागरात.
बुडून जाव वाटतंय.
तुझ्या पापण्यांचे तिरांनी
जखमी व्हावं वाटतंय..
पण स्पर्श माझा तुझ्या..
सौंदर्याला मळवेल
अशी भीती पण वाटतेय
तुझ्या पापन्यांभोवती पाझारणाऱ्या
त्या पाण्याच्या थेम्बातून.दिसणारी तुझी धुंद नजर
जणू..नयन द्वारांमधून अमृत वाहतंय अस वाटतंय..
त्या दवबिंदू वर पडलेला प्रकाश.
तुझ्या काळ्याभोर नयनांना नक्षत्रा सारख
लखलखीत बनवतोय..
तुझ्या ओठावरची ती फिक्कट गुलाबी रंगाची सर.
जणू अनंत फुलांचा गंध घेऊन वाहतोय अस वाटतंय..
आणि ह्या दृश्यात माझ मन कित्येक दिवस झाल..
सारख रमतय...
इतकी कशी ग सुंदर तू..
ज्याला घडवायला.
देव पण असमर्थ आहे

No comments:

Post a Comment