NiKi

NiKi

Wednesday, January 16, 2013

गाली तुझ्या....




गाली तुझ्या खळी कशी
श्वास माझे अडकले

केस तुझे सखे जणू
रेशमांनी विणलेले

डाळिंबी ओठ तुझे
रसरशीत फुललेले

नेत्र तुझे हरिणीचे
स्वप्नातच दंगलेले

कांती तुझी नव्हाळीची
केतकीचे बन फुले

निमूळती बोटे तुझी
चित्र कुणी रेखियले

वळसे देहाचे खास
नेमकेच उमटविले

कोवळा गं बांधा हा
जाईची ती वेल झुले

चाल तुझी हंसगती
पाहूनी गं मन भरले

दिसशी तू मूर्तिमंत
काव्यचि ते बहरले

सारखी तू दृष्टिपुढे
मन वेडे खुळावले

तुझ्याविना सुचेना गं
जीव कसा तळमळे

No comments:

Post a Comment