NiKi

NiKi

Tuesday, January 15, 2013



फक्त एक kiss
तुझ्याकडून हवाय मला
तो गंध प्रीतीचा
अर्थ देईल जगण्याला
तोच दूर करेल
तुझ्या माझ्या दुराव्याला
कवटाळून ठेवीन हृदयात
मी त्या क्षणाला
फक्त तू इतकंच कर -२-
तुझं मन निरागस कर
निर्मळ होईल मन तेव्हा
माझ्या गालाला स्पर्श कर
तुझ्या ओठांच्या पाकळ्यांचा
गंध माझ्या श्वासात भर
माझं देहभान हरपून
मला तुझा कर
मी बघेन वाट प्रिये
तुझ्या निरागस होण्याची
फक्त एक kiss हवाय
राहिलं आठवण तुझ्या प्रेमाची .

No comments:

Post a Comment