गुंफलेल्या हारामध्ये
सखी स्पर्शाचा गंध असतो
त्या गंध सहवासांत
मी भान हरपून बसतो।
आभाळातील तार्यांकडे
जेव्हां मी अटक पहातो
त्या मध्ये मला माझ्या
सखीचा चेहेरा दिसतो।
चेहेरा तिचा पाहताना
देहभान विसरून जातो
अन जीवनांतील दुःखाचा
क्षण काल विसर पडतो।
क्षणिक त्या आभासानें
नविन असा जोम येतो
अन जीवनाशी टक्कर देण्या
पुन्हां एकदा सज्ज होतो।।
No comments:
Post a Comment