रडतोय तो एकटाच दूर
वाट त्याला फक्त तुझ्या स्वरांची
धडपडतोय तो एकटाच सूर
संतप्त हाताने छेडताना
सूर तेची शोधतांना
वाट तुझी पाहण्यास अधूर
धडपडतोय तो एकटाच सूर
लाटांच्या त्या प्रत्येक थेंबांना
नाव तुझे सांगतांना
भरून येतो त्याचा उर
धडपडतोय तो एकटाच सूर
आठवणीत उरली त्याचा आता
फक्त तुझीच आठवण
तुझे ऐकण्यास सूर मधुर
धडपडतोय तो एकटाच सूर
No comments:
Post a Comment