नजरेला ती नजर भिडवूनी
नजरेला ती नजर भिडवूनी
बसलो आपण उगाच दोघे
मिठीत येता अशी अचानक
ओठ भिडे ओठांना अलगद
थरथरणारे ओठ गुलाबी
अजून पावत होते कंपन
डोळे मिटुनी क्षणात घेई
पुन्हा एकदा अधिरे चुंबन
चुटपुटसे ते होते काही
केवळ वेडे पहिले चुंबन
गोडी चाखीन पुन्हा एकदा
प्रदीर्घ आणि गहिरे चुंबन
लज्जेने तू मान फिरवुनि
चोरुन बघता मागे परतून
क्षणात माझ्या ध्यानी आले
पुन्हा तुलाही हवेच ते क्षण
No comments:
Post a Comment