चंद्राकडे पाहिलं कि तू आठवतेस
तुला पाहताना त्यालाही कुणी आठवत असेल का ग ?
तू येताना वारा तुझी चाहूल देऊन जातो
तू जाताना तोही हिरमुसला होत असेल का ग ?
तुला भिजायला आवडतं म्हणून पाउसही बरसायची वाट पाहत असतो
तुझ्या नजरेतली वीज पाहून तोही बेभान कोसळतो का ग ?
तुझ्या पावलांचा स्पर्श व्हावा म्हणून
किनाराही आसुसलेला होत असेल का ग
वाळूवर उमटलेली तुझ्या पावलांची मेहंदी
पुसली जाऊ नये म्हणून
लाटाही क्षणभर थांबत असतील का ग...?
तुझ्याशिवाय आयुष्य नको म्हणून श्वास काळजात अजून आहे
तू जाशील या भीतीने काळीजही सैरभैर होत असेल का ग ...?
जसे माझे मन तुला मागतंय तसेच
तुझेही मन मला मागत असेल का ग ?
तुझेही मन मला मागत असेल का ग ?
---पाऊसवेडा
No comments:
Post a Comment