गारठलेली रात
भिजलेली पाऊलवाट
दिशाभूल करणाऱ्या धुक्यात
मखमली तुझी साथ
चांदण्यात बुडालेला नदीकाट
पायास ओली करणारी गार गार लाठ
हळुवार चंचल वाऱ्यात
हाताला बिलगणारा तुझा हात
हिरव्या हिरव्या रानात
मंद मंद काजव्याचा प्रकाश
बेधुन्ध करणाऱ्या निशिगंधाच्या मोहात
श्वासात दरवळणारा तुझा स्वास .......
No comments:
Post a Comment