NiKi

NiKi

Wednesday, January 9, 2013



आज कुणाचं हसू आठवून
आसवं दाटून आली
आज कुणाचं नसणं आठवून
असणं साठवून गेली

आज कुणाचं फसवं रुसणं
फुदकन हसवून गेलं
आज कुणाचं सकाळी गाणं
ओठी चकवून गेलं

आज कुणी आठव आठव
मनात भरून गेलं
आज कुणी झोपलं रान
उठवून पेटवून गेलं

आज तुही नसशील तुझी
असशील फसशील तू
आज तुही खिडकीत बसशील
कुठेच नसशील तू

आज तुला आठवेल काल
उगाच घरभर फिरशील
आज तुलाही वाटेल वाईट
भिजले डोळे पुसशील

उद्या परत येईल मी
परत खोटंच हसशील
उद्या परत माझं सांगणं
अन मलाच वेडं म्हणशील

No comments:

Post a Comment