एकदा सहज विचार केला ....
कि कविता लिहू तुझ्यावर , पण
तू तर इतकी नाजूक आहेस कि पेन टोचेल तुला
म्हणून लिहितोय या कागदावर ..

मग विचार केला कि नक्की काय लिहू कवितेत ...
आणि ठरवलं कि ...
कविता-कविता म्हणजे काय असते ,
तुझ्या सौन्दर्याच वर्णन करण्याची
एक वेडीशी ट्राय असते ..
आणि हां कविता हे अनेक मुलींचे नावही असते ...

जेव्हापण तू हसतेस तेव्हा सेल संपतात घड्याळातले
काटे थांबतात जागेवर आन क्षण गोठतो तुझ्या पुढे
केसांना क्लीप लावूनी करतेस जेव्हा बंधिस्त
हळूच लट एक बाहेर येयून स्पर्श करते गालाला
काय करू मी वर्णन तुझ्या भुवयांमधील गंधाचे
सूर्य उगवतोय पहाटेचा जणू दोन डोंगरांच्या मध्ये.
वाळवंटातील मृगजळ आहेस पटत नाही या मनाला,
तू तर आहेस नदी एक जी मिळणारच या " सागराला "
ओठांमधील शब्द तुझे जेव्हा स्पर्श करतात कानांना
शब्द नसून तूच स्पर्शते असे भासते बघ या वेड्याला
फक्त तुझा ... आणि फक्त तुझ्यासाठी हि कविता मझी " Pearl " ..Pearl कायम सागरात आसते
No comments:
Post a Comment