NiKi

NiKi

Friday, January 18, 2013



तुझा शब्द इतक्या हळुवार पडला कानी,
जसं पडावा अंगावर पहिल्या पावसाचं पाणी.

पहिल्यांदा नजर देऊन पहिली कुण्या ओठांची हालचाल,
शब्दच विसरलो त्या नादात अशी होती ती कमाल.

अलवारपणे खालचा ओठ स्पर्शत होता वरच्या ओठाला,
जितक्या अलवारपणे फुल सोडतेओघळताना देठाला.

त्या दोन सुंदर पाकळ्यांनी मनात सुरु केला दाह,
मोक्ष कुणीही सोडून द्यावा इतका मोहक होता तो मोह.

शब्दच माझे विसरून गेले त्यांच्या अस्तित्वाच्या ओळी,
मौनाचे ऋणही फिटून गेले तू बोलत असते वेळी.

तुझा शब्द संपवत होता कल्पनेतले आणि वास्तवातले अंतर,
शासही स्वताचा ऐकू आला तू निघून गेल्या नंतर.

इतकं पुरेस होतं आता हा उरला जन्म जगण्यासाठी,
जन्मलो तर तीळ बनून जन्मेन पुन्हा तुझ्याच ओठी

No comments:

Post a Comment