NiKi

NiKi

Wednesday, January 2, 2013



विरहाने जळते आहे
अंग अंग माझे सारे
औषध न मिळे त्यांस
पालथे झाले डॉक्टर सारे ।
पाण्यामध्ये पडून राहिलो
ज्योत्स्नेत भिजवले अंग सारे
परि कमी होईना ते
शरीरांत पेटलेले निखारे ।
फुलांची केली शेज
कांटे ते मज भासले सारे
लेप लावले चंदनाचे
सुकून ते गेले सारे ।
आग नाहीं थांबली
यत्न फुकट गेले सारे
थांबली ती आग जेव्हां
जळुनी गेले हृदय सारे ।।

No comments:

Post a Comment