स्पर्श तुझ्या मिठीचा
अजून मज जाणवतो
नजरेतील प्रेमभाव
नेत्रासमोरी उभा राहतो ।
तव कुंतलाचा मोद गंध
अजुनि मनीं दरवळतो
श्वासांतील अधीर भाव
अजुनि मज भुलवितो।
शुक्राची चांदणी ती
आभाळी पुन्हां आली
परि दग्ध विरहाची शिक्षा
आता मला मिळाली ।
प्रीतिची हूरहूर ती
जीव घेणी-जीव घेणी
अंतरांत भिरभिरती
धुंद तरल भाव कोणी ।
भरतीची ओढ जशी
किनाऱ्यास लागते
तूं नसताना आतां
आठवणींस उधाण येते ।
आठवणी तव कायम
माझ्या मनास पोखरतात
No comments:
Post a Comment