NiKi

NiKi

Thursday, May 30, 2013

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते.
 ते 
एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात,
एकाच वेळी झोपतात. 
तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो..,

अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो..,

ज्यांना कधी ओळखतही नसतो..,
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.....
जी माणसे हवीशी वाटतात
ती माणसे भेटत नाहीत
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नको असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काल संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो
तेव्हा काल संपलेला असतो
नशीब हे असच असत
त्याच्याशी जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते
चिंब भिजलेली रात्र.........
चिंब भिजलेली एक रात्र
अजुनही निजली नाही
तुझ्या आठवणींची एक सर
अजूनही सरली नाही
किती वारे आले अन्गेले कितीतरी तुझ्या श्वासाने दरवळलेली एक झुळुक
अजूनही विरली नाही
शिंपडू देत मनसोक्त आज मला
माझीच आसवे
तुझ्या विरहाची अग्नी
अजूनही शमली नाही
मला आयुष्यभर तुझ्याबरोबर चालायचय..
तुझ्या विचारात रमायचय..
तासनतास तुझ्याबरोबर बोलायचय..
तो भावनांचा खेळ मला तुझ्याबरोबर खेळायचाय..
प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांत तुझ्याबरोबर असायचय..
ते तुझे रुसनं मग माझे मनवने..
ते सगळे तुझ्याच बरोबर करायचय..
मला तासंतास तुला पाहायचय…
तुझ्या डोळ्यांतील नशा पिऊन मला जगायचय..
मला अंतापर्यंत तुझ्याबरोबर रहायचंय.
कधी सांजवेळी ...
पापणीला पूर येई ...
आठवणी ओल्या तुझ्या ...
दूर दूर नेई !

ओघळत्या थेंबांचे ...
नाजुकसे क्षण ...
एकेक थेंब ...
सारं सांगून जाई !

भिजलेल्या डोळ्यांनी ...
कातरवेळ टळून जाई ...
त्या वळणावर तुझी ...
रोज आठवण येई !

किनाऱ्‍यावर वेचलेले ...
सुखदं क्षण,
वेड मन माझं,
साठवून घेई !

तुझ्या माझ्या मैफिलीचा ...
एक नाद येई ...
पावले हळूच, तोच ठाव घेई

तुझ्या गोड मखमली ...
स्वप्नांचा ...
प्रिये , मज रोज भास होई ...
रोज भास होई !!
संथ वाहणारी नदी
पायाखाली वाळूची गादी
दोन पाय माझे
आणि जोडीला दोन तुझे
दूरपर्यंत पसरलेलं पात्र
प्रेमाने भरलेलं हृदयाच गात्र
संथ प्रेमाचा प्रवाह वाहतोय
तुझ्या पायातून माझ्या कडे
माझ्या जगण्याला अथांग
संथपणाचा स्पर्श घडे

काय असते आठवण?
मनात रुजलेली,
रंगात भिजलेली इंद्रधनुसारखी
सातही रंग उधळणारी,
कधी एकटेपणा वाटला तर,
... गोड स्मृती जागवणारी,
आणि कधी डोळे भरून आले तर, अश्रू म्हणून वाहणारी.
खरंच काय असते आठवण?
वर्तमानात राहूनसुद्धा भुतकाळात नेणारी,
कोणी दूर असले तरी जवळ असल्याचा भास देणारी,
खरंच काय असते आठवण?
मनातील गोड आणि कटू स्मृतीँचा आस्वाद
तर कधी अचानकपणे पडणारा भास
हीच असते आठवण, खरंच
हीच असते आठवण..!!

मावळत्या सूर्या सवे उधळीत प्रेम बसली ती सांजवेळी
भारावलेल्या डोळ्यातील स्वप्ने घेउन माझ्याजवळी......

हात माझा हाती घेत ओघळले अश्रु तुझे
थेंम्बा थेंम्बात एकच नाव मलाच दिसले माझे.....

सांज विजुन रात झाली आली रात राणी
डोळ्यातील स्वप्नात जखडलो आम्ही दोघ आडाणी.....

घाबरलेल्या मनास माझ्या ठेविले प्रज्वलित श्वासांनी
होकार देत नजरेतुनी सावरले मलाच तिच्या आसवांनी.....

होता नवता विचार संपला जणू जिंकल जग सार
नजरेतुनी होकार मिळता चिंता पळाली पार.....

थरथरलेल्या मनातून पडला गळून शब्दांचा नकाब
तना मनाच्या व्याकुलतेला मिळाला प्रेमाचा जाब.....

जन्म मरणाच्या या फेरीला मिळाली नवी साथ
रात चांदण्यास देत साक्षी आयुष्यभराचा धरला हात.
प्रत्येक समुद्राला एक किनारा असतो, 
त्या किनाऱ्याशिवाय समुद्राच्या अवाढव्यतेला काहीच अर्थ नसतो!!!
 समुद्राचं पाणी नेहमीच त्याच्या किनाऱ्याकडे ओढ घेतं..
माझं मनही एक समुद्रच आहे.
एक अथांग समुद्र....
इथे येणारी प्रत्येक भावनेची लाट किनारा शोधते...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं
मी लाखो जन्म घेईन......
तुझ्याबरोबर चालण्यासाठी...
तुझ्याबरोबर बोलण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं
मी लाखो जन्म घेईन....
तुझ्याबरोबर हसण्यासाठी...
तुझ्या अबोल ओठांतले शब्द ओळखण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं
मी लाखो जन्म घेईन.....
तुझ्यावर जीवापाड प्रेम कराण्यासाठी...
तुझ्या बोलक्या डोळ्यात स्वतःला साठवण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं
मी लाखो जन्म घेईन.....
तुझ्या नकळत् तुला माझ्या जीवनातआणण्यासाठी...
माझ मी पण हरवुण जाण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं
मी लाखो जन्म घेईन.....
तुझ्यावर निख्खळ प्रेम करण्यासाठी...
तुझ्या पावलांचे आभास अनुभवण्यासाठी.. .
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं
मी लाखो जन्म घेईन.....
रात्र रात्र तूझ्या आठवनीत जागण्यासाठी...
तुझ्यावर निस्वार्थी प्रेम करण्यासाठी...
या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं
मी लाखो जन्म घेईन......
तुला एकदा पाहण्यासाठी...
मन माझे बावरलेले,
लक्ष्य नाहि ठिकाणावर,
कोठे नाहि दुसरीकडे,
फ़क्त तुझ्या ओठावर.

नजर गेली हारून,
समोर काहीच नसते,
गालावारिल खळी तुझ्या,
सततच मला दिसते.

कान जाले बधिर,
ऐकू काही येइना,
तुझी मंजुळ हाक,
डोक्यातून जाईना.

झोप गेली उडून,
फ़क्त तुलाच पाहतो,
तुझ नाव लिहित,
नुसता पडून राहतो
तुझ्यासाठीच जगायचय..
तुझ्यासाठीच मरायचय..
तुला जिंकण्यासाठी आता तुझ्याशीच
हरायचय..

तुझ्या निळ्या डोळ्यांतल्या सागरात
बुडायचय..
पोहता येत नसलं तरी, डोळे
मिटुन पडायचय..

तोडुन सर्व बंध हे.. तुला मिठीत
धरायचय..
श्वासांमध्ये गुंतेल श्वास.. असं
काही करायचय..

ध्यानी, मनी, स्वप्नी, चित्ती..
फ़क्त
तुला स्मरायचय..
या जगात नको पण..
तुझ्या मनात उरायचय.. —
एकदा ती माझ्याकडे आली
एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत

गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत

हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची

तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात

काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !!!!!
पावसा बरोबर वाहून येतात
तुझ्या बरोबर घालवलेले क्षण
गुंततो तुझ्या आठवणीत मी आणि
तुझ्याच मागे धावते मन
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

त्या वेळी आसपास कोणीही नसावे असे वाटते
आजुबाजुचे रान सारं गप्प गप्प झालेलं असतं
धुक्यानेही रानसारे गच्च गच्च झालेलं असतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

आले आले मी आले करत सर धावतं येते
तुझ्या आठवणींचे पिंपळपान मग मनात दाटुन येते
त्या आठवणींच्या जोरावर पुन्हा उंच उडावंस वाटंत
स्पर्श करुन तारयांना खाली खेचुन आणावंस वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

त्या तिथे आज कुणीही येऊ नये असं वाटंत
अचानक कुठुन तरी आभाळ वर दाटतं
तलावाच्या काठी मग माझं मन भिजु लागतं
पाण्याच्या पार्श्वभुमीवर आपलं इंद्रधनुष्य शोधु लागतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

पाऊस थांबल्यानंतर निसर्गाची रुपे निरखु लागतं
थव्यांसोबत पक्षांच्या मन मात्र उडु लागतं
गवताच्या पात्यांवर पडलेल्या थेंबाप्रमाणे दुःख सारं मग ओसरु लागतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते
आठवण माझी आली कधी,
तर सागरकिनारी जाऊन बघ..

 हजारदा किना-याला मिठीत घेऊन सुद्धा,
परतणाऱ्या निराश लाटेचं विव्हळणं
बघ..
आठवण माझी आली कधी,
तर साद मला घालून बघ..
तुझ्या अवतीभोवती फिरणारं, 

माझं अस्तित्व जरा जाणवून बघ..
माझं अस्तित्व जरा जाणवून बघ
माझा प्रत्येक कल्पने मध्ये तू आहेस
संपलेल्या गाण्याच्या कंपना मध्ये तू आहेस
बरसून गेलेल्या पावसाच्या श्वासात तू आहेस
संध्या काळच्या संधी प्रकाशात तू आहेस
नुकत्याच काडलेल्या चित्राच्या हास्यात तू आहेस
मी गेलो आहे संपून पण माझ्या नसण्यातही तू आहेस.
जमलंच तर I LOVE U बोलून बघ
आयुष्याची ही घडी
थोडीशीच उलघडून बघ
वाट पाहतोय तुझी मी
या चार शब्दांची
आतुरता दाटली मनात
ओढ तुझ्या होकाराची
झालीच जर का तू माझी..
तर तुला काळजात जपून ठेवीन
दगा दिलास या प्रेमाला
तर
हेच काळीज काढुन तुझ्या चरणी ठेवीन
प्रेम करतो तुझ्यावर
न हा शब्द उचारू नकोस
लाख दुवा मागतोय मी त्या प्रेमदेवाकडे
मन त्याचा तोडू नकोस
तुझ्या होकारवायूची गरज
असलेला प्रेमाच्या कोमात गेलेला
फक्त तुझाच होवू पाहणार...♥♥
तू असल्यावर...
माझ्या शब्दांची कविता बनते,
पेन्सीलच्या रेघोट्यानचे चित्र बनते,
गुणगुणण्याने गाणे बनते...

तू असल्यावर...
चित्रंसुद्धा हालचाली करतात,
निर्जीव वस्तू सजीव होतात,
भर दिवसा आकाशात चांदणे पडतात,
अशी आहे माझी प्रेयसी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी आहे माझी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी...
.
खुबसुरत नसलो तरी,
चारचौघात मला शोभून दिसणारी
.
शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी आहे
.
बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र आहे
.
हाय… हेलो… नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी
.
पण मनाने सुंदर आहे
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी……
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी…..
.
अशी आहे माझी प्रेयसी…

Wednesday, May 29, 2013

तुझे मन माझे झाले
माझे प्राण तुझे प्राण
उरले ना वेगळाले

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तुझे होती भास

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे-
गूज माझ्यातुझ्यापाशी

तुझी-माझी पटे खूण
तुझी-माझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन तुझे मन
एक शब्द
तुझ्या हसण्याचा
ओठी माझ्या....
एक शब्द
तुझ्या फुलांचा
नसानसात माझ्या..
एक शब्द
तुझ्या प्रेमाचा
मनात माझ्या..
एक शब्द
तुझ्या रात्रीचा
स्वप्नात माझ्या..
एक शब्द
तुझ्या रूपाचा
डोळ्यात माझ्या..
एक शब्द
तुझ्या इशार्याचा
काळजात माझ्या..
एक शब्द
तुझ्या सहवासाचा
कवितेत माझ्या..
तू असलीस कि मनी एक वेगळाच नाद असतो

गर्दीत हि बाग फुलावी असा प्रेमळ आभास असतो

कटू उन्हातही तुझ्या सावलीत क्षणभंगुर अ सतो

मनी मात्र तुझ्या आठवणीचा कल्लोळ असतो
नाते ना जुळले जरी
प्रिया तुझे नि माझे
आठवण तुझी येता
मन का उदास होते?

आठवण तुझी येता
मी सारा काही विसरते
तुज्या स्वप्नील डोल्यातील
स्वप्ना होऊन जगते

आठवन तुझी येता
मी रात्र रात्रा जगते
तुज्या आठवणीत कूरवाळत
उगीच कूस बदलत राहते
प्रेम आणि पाऊस
दोन्ही हि एकच आहेत.
दोन्ही हि नेहमी
अविस्मरणीय असतात.
पाऊस जवळ राहुन
अंग भिजवतो आणि
प्रेम दुर राहुन डोळे भिजवतो
तु जेव्हा हसतेस
आणखीन सुंदर दिसतेस
तु जेव्हा रुसतेस
भलतीच प्रेमळ दिसतेस
तु जेव्हा फुगतेस
काटकोनात बसतेस
तु जेव्हा शांत बसतेस
फारच रागीट दिसतेस
तु जेव्हा लाजतेस
माझ्या मनात बसतेस
तुझ्या नजरेत भरलेल्या सागरात.
बुडून जाव वाटतंय.
तुझ्या पापण्यांचे तिरांनी
जखमी व्हावं वाटतंय..
पण स्पर्श माझा तुझ्या..
सौंदर्याला मळवेल
अशी भीती पण वाटतेय
तुझ्या पापन्यांभोवती पाझारणाऱ्या
त्या पाण्याच्या थेम्बातून.दिसणा री तुझी धुंद नजर
जणू..नयन द्वारांमधून अमृत वाहतंय असवाटतंय..
त्या दवबिंदू वर पडलेला प्रकाश.
तुझ्या काळ्याभोर नयनांना नक्षत्रासारख
लखलखीत बनवतोय..
तुझ्या ओठावरची ती फिक्कट गुलाबी रंगाची सर.
जणू अनंत फुलांचा गंध घेऊन वाहतोय असवाटतंय..
आणि ह्या दृश्यात माझ मन कित्येक दिवस झाल..
सारख रमतय...
इतकी कशी ग सुंदर तू..
ज्याला घडवायला.
देव पण असमर्थ आहे
आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु.
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न
आहेस तु..
हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलं होतं,
ते
मागणं आहेस तु
ओठावर तूझ्या स्मित हास्य
असु दे
.
जिवनात
तूझ्या वाईट दिवस नसु दे.
.
जिवनाच्या वाटेवर
अनेक मिञ मिळतील तुला
.
परंतु
.
हदयाच्या एका बाजुस
जागा माञ माझी असुदे
भावना व्यक्त करन्याचा
धोका पत्करायचा असतो

वाईटात वाईट काय घडेल
याचा विचार करायाचा नसतो

चालतं... बोलतं .... स्वप्न पाहिले
तो दिवस विसरायचा नसतो

तुझ्या सहवासामुळे मी
माझे आयुष्य घडवु शकतो !

Tuesday, May 28, 2013

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी 
तशी तू  जवळी ये  जरा 
कोऱ्या कागदाची कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोलना
आभाळ खाली झुके पावलांखाली धुके - २
सुख  हे नवे  सलगी करे का सांगना

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी 
तशी तू  जवळी ये  जरा 


सारे जुने दुवे जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देना
माझी हि आर्जवे  पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू  जरा हातात हात दे
पुसुया जुन्या पाउलखुणा सोबत तुझी साथ दे

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी 
तशी तू  जवळी ये  जरा 


वळणावरी तुझ्या पाउस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ  दे
डोळ्यातल्या सारी विसरून ये घरी
ओळख आता खरी  होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ हि तुला
इतकी का सुंदर दिसतेस तू,
मी विचारल्यावर हळूच गालात
का हसतेस तू,

उघड कधीतरी हे रहस्य
हि कसली जादू केलीस तू,
तुझ्यातच माझं मन रमतं,
तुझ्या सहवासातच ते हसतं,

समजून का घेत नाहीस तू,
इतकी का सुंदर दिसतेस तु.

Monday, May 27, 2013


स्वप्नात माझ्या काल एक आली होती परी..
स्वप्नात माझ्या काल एक आली होती परी..
तिला मी म्हणालो परी, तू ये ना माझ्या घरी..

घर माझं छोटसंच पण आहे टुमदार,
स्वच्छ परिसर अन सुंदर आवार,
स्वर्गच आहे जणू हा भूमीवरी..
तिला मी म्हणालो परी, तू ये ना माझ्या घरी..

घरी तुझ्या ओळखीचे एक 'चित्र',
ते माझे बाबा होते ग माझे मित्र,
आले आहेत स्वर्गात ते परी तुझ्याच घरी..
तिला मी म्हणालो परी तू ये न माझ्या घरी..

आई माझी तुझ्यासारखीच एक परी,
तू स्वप्नातली पण ती आहे खरी,
खूप माया करते ती माझ्यावरी..
तिला मी म्हणालो परी तू ये न माझ्या घरी..

माझी एक ताई, माझा एक भाऊ,
त्यांच्या गुणांचे मी किती गुण गाऊ,
ओझे माझे नेहमी त्यांच्या खांद्यावरी..
तिला मी म्हणालो परी तू ये न माझ्या घरी..

घरात माझ्या आहे एकच कमी,
हृदयाची खोली अजून रिकामी,
काळजाची जागा घेईल कुणीतरी..
तिला मी म्हणालो परी तू ये न माझ्या घरी..

परी मला म्हणाली, मी तुझ्या घरी निघाली..
मग क्षणार्धात ती परी माझ्या घरी अवतरली..
खोटे नाही सांगत कहाणी आहे ही खरी..
ही पहा ती परी जी आली माझ्या घरी.
..
पावसाचे प्रेम..
प्रेमातला पाउस..
आतुर ओढीने
कसे तुला सांगू ग...

एकमेकांच्या मिठीत
चिंब त्यांचे भिजने..
अंग अंग त्यांचे शहारले
कसे तुला सांगू ग...

बहरल्या वसंतात
बहरतो प्रेमाचा मळा
लाल गुलाबी फुलांची
लाल गुलाबी प्रीत..
कसे तुला सांगू ग...

स्वप्नातल्या कळीचे
हळूवार लाजून उमलने..
गुलाबी गुलाबी ओठांचे
मादक ते हसने..
कसे तुला सांगू ग...

चिंब पावसात
चिंब तू चिंब मी..
चिंब बरसतो एकमेकांवर..
चिंब प्रेमाची चिंब कहाणी
कसे तुला सांगू ग...

चिंब भिजून..
लाजली तुझी काया..
लाजलेल तुला पाहून
मदमस्त माझे तारुण्य
कसे तुला सांगू ग...!!!
तिच्या प्रीतीमुळे.
गंधीत आसमंत हे दरवळली होती फ़ुले
बहरात जिंदगी होती त्या तिच्या प्रीतीमुळे.

क्षितीजावर उधळी सांज रंगसंगती
त्या रंगात भिजत होती अपुली प्रीती
रंगीन स्वप्न होती रंगीत ती होती पळे.

अंधार दाटलेली जरी रात होती
तरी मनी नव्हती अंधाराची भीती
फ़ुलूनी नभी येती तेव्हां चांदण्यांचे मळे.

आज मला जग वैराण माळ वाटे
बहरात अता फ़ुलूनीच येती काटे
रिमझिम ही श्रावणाची भरी आसवांचे तळे............
ओंजळीत  तुजीया,  फुलांनी  गर्दी  केली ,
गंध  पसरला  मोगर्याचा ,
वेणी  मध्ये  अडकली , भान  हरवून  गेली ,
विसर  पडला  जगाचा ,
मोगार्यासम  तू , मधाळ गंधाळ लेली ,
तुझ्या  मिठीत  न्हावी,  रात्र  अंधारलेली   ,
किती  पाहावे  भावूक  , डोळे  बोलणारे ,
शब्द  अंतरीचे,  पापणीत  सांडणारे ,
गुलाबापरी  राक्त्पिर्णी,   ओठांचे  बहाणे ,
अदा  मादक तयांची , क्षणात  जीवघेणे
श्वास  उबदार , मज  आर्त  साद  देई ,
येऊन  तू  मुक्याने,  अलगद  मिठीत  गेई
मी  अधीर  अधीर ,  जणू  पाऊस  दाटलेला
ओल्या  तुज्या  मिठीने,  मी  चिंब चिंब भिजलेला ,
तुझ्या  बेभान  सरींचा,  पाऊस  बरसणारा
वेचण्या  तृप्त  गारा, मी  अवखळ  बिलगणारा,
मुके  झाले  शब्द  सारे, श्वास  बोलू  लागले ,
तुझे  माझे  गोड  उसासे , एक स्वप्न  सजवू  लागले .
    रोज निजताना
   आकाशाला भिडणारी
   छान छान स्वप्न पहावी
   पूर्ण करण्याची जबाबदारी माझी
   पण स्वप्न मात्र तुझ्या कुशीत दिसावी
नाकी नथ, नेसून शालू ...
बांधिल्या भाळी मंडवळ्या...
शोभती साऱ्या अलंकारा,


शौभाग्याच ते लेण...
लावून कपाळी,
सर्वगुणसंपन्न ती.
स्वप्नातील सुंदरी

एक सुंदरी आली काल स्वप्नात
गाढ झोपेत तरी वाटे सत्यात
जागविले तिने आपल्या हाताने
फिरवुनी नाजूक बोटे माझ्या केसात
एक सुंदरी आली काल स्वप्नात

नजरेला नजर माझ्या लाविली
गोऱ्या गालात हळूच ती हासली
माझेच मला काही कळेना
बघतच राहिलो तिच्या डोळ्यात

माझ्या गालावर टीचकी मारिली
मजकडे थोडी खाली ती वाकली
चेहरा तो माझा झाकून गेला
तिच्या रेशमी सुंगंधी केशभारात

एक हात माझा तिने धरिला
संगे चलण्याचा इशारा केला
चालू लागलो मी हि तिच्या सवे
तिच्या कटी भवती टाकुनी  हात

गेलो आम्ही स्वर्गीच्या प्रीतवनात
होता तिथे एक उंच प्रपात
धावतच जाऊनी उभे राहिलो
खाली झेपावणाऱ्या शुभ्र धारेत

तिची  विरल वस्त्रातली काया
ओली बिलगली तनुला माझिया
भ्रमरापरी स्वछंदी झालो
घेउनी मधुघट अधरात

मग उचलुनी तिला घेतले
बकुळीच्या तरुतळी ठेवले
फुलांच्या शेजेवर सुकाविले
माझ्या बाहूत चंद्राच्या उन्हात

Thursday, May 23, 2013



लाडके गाल थरथरले आज
चुंबनांचे हलके गाज
नशा उसळेल प्रितीची अन
श्वासांमधे भिनतील श्वास

चेहरा तुझा ओंजळीत
स्वर्गच जणु झोळीत
दोघांमधे अंतर शुन्य
प्रणयाच्या स्पर्शाची आस

बंधने सुटतील जगाची
ओठांवर भाषा ओठांची
गंध तुझ्या त्या श्वासांचा
सत्य म्हणू की सुवर्ण भास

मोगरा झुरतो वेणीशी
रातराणी अंगणाशी
सारे गंध फिकेच आज
दरवळतो तुझा सुवास

देह विखुरले देहात
गुज कोठले डोळ्यात ?
पुरे जरीही वाटत असले
सोडवु नको हा समास ..


तिच्या गो-यापान देहाला चांदणं लगडतं
तिच्या पाठीचं गोंदण उगाच् फुरंगटतं

तिला स्पर्शताना वारा अजूनच् मंद
परिमळ त्याचा करतो आसमंत धुंद

बटा तिच्या हतबल, किती झाकणारं
चंद्र चुंबितो चेहरा, किती वाचवणारं

तिच्या गात्रातून सा-या सांडे तृप्तीची साय
कधी खुशीत कुशीत, कधी कुशीत खुशीत

तिचे रूप, तिचा वेग, सारे लावण्याचे लेणे
मिळता मिळता निसटतं हे यौवनाचे देणे


पावसात भिजताना
तूच येतोस जणू जवळ
तूही असाच ओढतोस मिठीत
अगदी जवळ अगदी जवळ

अंगाखांद्यावर हात त्याचे
कधी रेशीम कधी लागट
तूही कधी मित्र असतोस
कधी घुसळण अति चावट

बास आता म्हणूनही
तुमचा जोर संपत नाही
चिंब भिजण्याचे क्षण
किती दिवस आठवत राही

येणार येणार वाट पहात
तुम्ही दोघं येत नाही
आलात तर असे जोरात
तड तड जशी लाही

पाऊस पडून गेल्यावर
कसं छान मोकळं होतं
तू भेटून गेल्यावरही
तसंच काहीसं होतं....


घन बरसत नित तळपत बिजली
मन विचलीत ही तळमळ कसली
शाम-मेघना, शामल सजना
कोमल प्रिती, सूख वेदना
राह तकत, यांदे गहिवरली


सावन जलती आग तनावर
रोखुं कैसे भाव अनावर
ईंद्रधनुवर, चिंब सरीतुन
कैसे जोगन, ढुंढे साजन
गात्र तुझ्या गंधाने सजली..
घन बरसत....


साजन संग ये, जग बिसरावे
मुक्त आसवे, नयनी यावे
संग सुखाचा देह-मनातुन
जगले मीलन, सरसरला क्षण
आग तुझ्या स्पर्शातुन विझली.

घन बरसत नित तळपत बिजली


"सखे तू "

तुझ्या गुलाबी ओठांवर ओठ माझे
टेकताच, तू अलगद डोळे बंद करायचीस. अन माझ्या ओठांच्या मिठीत तू, ओठांबरोबर स्वत:ही हरवायचीस.

मधेच माझ्या ओठांतून तू,
ओठ तुझे सोडवायचीस.
अन लाजाळू सारखी लाजत हलकेच मान खाली घालायचीस.


लाजेने खाली गेलेली मान तुझी, मी हळूच वर उचलायचो.
अन् तुझ्या डोळ्यांवर आलेले ते केस बोटांनी हलकेच मागे सारायचो.

माझ्या नजरेला नजर देताना तू, सखे किती ग बावरायचीस. क्षणाचाही विलंब न करता तू, माझ्या मिठीत शिरायचीस.
निमुळदार हनुवटी
शुभ्र मोत्यांची पंगती,
त्यावर ओठांची फुल पाकळी

खळाळत हास्य..
अन गालांवर अल्लड खळी
जोडणारी त्याला सुबक
दोन कानाची कोयरी

सरळ धारधार नाक
शेजारच्या खोबणीत
टपोऱ्या डोळ्यांचा धाक

त्यावर भुवयांचा धन्युष
त्यात नजरेचा बाण

उंच भाळ त्यावर केशा ची नक्षी
मधोमध भांगात कुंकवाची लाली
चेहऱ्यावरची ओळख, मात्र तीच नवी जुनी


मिठीत येता सखया सरली अवघी भाषा
ओठांवर ओठांची उरली एकच भाषा

मिठीत येता सर्वांगावर काटा फुलला
हुरहुर कसली, ओढ अनामिक नकळे मजला

मिठीत येता नेत्र सहज ते मिटून गेले
स्वर्गसुखाला नजर न लागो समजुन गेले

मिठीत येता काया अवघी ये घामेजुनी
दंवबिंदू लेवून थरथरे मुग्ध कमलिनी

मिठीत येता मनामनाची हो समरसता
जाणिव संपुन व्यापुन राही एक तृप्तता

मिठीत येता माझे मीपण संपून गेले
मी-तू पणही गेले आता सुखचि उरले

मिठीत येता आवेगातच घडले सारे
स्वप्न म्हणू की स्वर्गसुखाचे असे पिसारे ......


गाली तुझ्या खळी कशी
श्वास माझे अडकले

केस तुझे सखे जणू
रेशमांनी विणलेले

डाळिंबी ओठ तुझे
रसरशीत फुललेले

नेत्र तुझे हरिणीचे
स्वप्नातच दंगलेले

कांती तुझी नव्हाळीची
केतकीचे बन फुले

निमूळती बोटे तुझी
चित्र कुणी रेखियले

वळसे देहाचे खास
नेमकेच उमटविले

कोवळा गं बांधा हा
जाईची ती वेल झुले

चाल तुझी हंसगती
पाहूनी गं मन भरले

दिसशी तू मूर्तिमंत
काव्यचि ते बहरले

सारखी तू दृष्टिपुढे
मन वेडे खुळावले

तुझ्याविना सुचेना गं
जीव कसा तळमळे
जेव्हा तुझे ओठ सखे,
माझ्या ओठांशी जुळायचे...

 ओठांवर अडलेले शब्द तुझे,
 त्या सुखद स्पर्शाने मला कळायचे...


चिंब मिठी....

सर्सर सर्सर वळवाची सर
आली अचानक धावत धावत
थेंब टपोरे माथी झेलत
झाडे वेली अवघी नाचत

अवेळीस हा पाऊस चावट
तुझ्या बटांवर होता अलगद
झाडाचा आधार चिमुकला
तिथेच तू ही होती निथळत

थरथरणारा देह तुझा तो
भिजून सारी वसने ओली
भिरभिरलेल्या त्या नजरेतच
भिती अनामिक तरळून गेली

कडाड् लखकन वीज चमकता
नकळत सारे अवचित घडले
मिठीत केव्हा अलगद दोघे
तुला- मला ना काही कळले

चिंब चिंब हा पाऊस अजूनी
तनामनाला हुरहुर लावी
पाऊस येता वळवाचा तो
चिंब मिठी ती स्मरते सारी
त्या धुंद रात्री,
मी तुझ्या ओठांतले अमृत प्यालो...

अन् या पृथ्वीतलावरील,
मी स्वर्गसुखात न्हालो..
ती रात्र........
अंधारलेल्या त्या गडद रात्री ,
क्षितीजाचा झाला  पार शेवट.....

निस्तब्ध रस्त्यावर, स्वताचीच चाहूल स्वताच घेते झाड ,
पाने गळू लागली आता , सोडून झाडांचा हात.....

नितेज माती धाऊ लागली सैरावैरा,
रस्त्याच मग काये दोष , पाऊलवाटांना जवळ घेताना....

बिथरलेल्या चंद्राचे डोळे पुसत पुसत वारा देतो धीर ,
कधीही  नसलेल्या प्रेमाचे नकळत कळले गुपित....

कावऱ्या बावऱ्या पक्षांनी केला मोठा किलबिलाट
उठवले थंडीला उगाचाच , जणू वाऱ्याच्या विरोधात...

निस्वार्थ जगणारा धबधबा म्हणतो , नका रे अस करू.....!!!
आपल्यातच भांडण्याची चूक परत नका करू ..

रात्र संपली , चंद्र झोपला , सूर्याला देत अलीगन....

पण शेवटी निसर्गानेच प्रश्न मांडला ,
कधीही न सापडणारया उत्तारबद्दल....

Wednesday, May 22, 2013

........सात जन्माची त्याची सोबत...राहू दे
आठवा जन्म मात्र मला ...नक्की दे

वाट पाहीन आणखी सहा जन्म
तेंव्हाचे वचन मात्र मला ...नक्की दे

तू सांगशील तेथेच जन्म घेईन
शहराची ओळख पूर्वी ...नक्की दे

रंग रूप सजवीन,अडका खूप कमवीन
मनातले भाव न हाव मात्र ...नक्की दे

आवडेल ते साठवेल पुन्हा पुन्हा
आवडीतला ठाव मात्र ...नक्की दे

मी हि वागेल मनकवडा सद्दैव
सात जन्मी मनी राहशील वचन एवढे ...नक्की दे
रेतीचे कण  हवेच्या कणाकणात
घुसमटले श्वास त्यात
मन झाले सैरभैर
………।
चोरपावलांनी चालली स्वप्न
अनवाणी हळुवार
उरात रुतवून सल
काहूर दाटले देह तरंगात
अंतरंगात पाऊस तुझ्या आठवणींचा
अन 'घनव्याकूळ 'मी
तुझ्यावाचून तुझ्याच रंगात ……
तुझ्याशिवाय जगणे
हे मरणासम भासते
चेहय्रावरती असून हासू
आसू नयनात दाटते

तुझ्याशिवाय जगणे
जणू ग्रीष्मातले वाळवंट
दोन क्षणाचे ना सुख
नेहमी ह्रदयात खंत

तुझ्याशिवाय जगणे
म्हणजे विषाचाच प्याला
सुखाचे क्षण ही वाटतात
दुःखाचे डोगर मला

तुझ्याशिवाय जगणे
म्हणजे पाण्याविणा जगतो जसा मासा
तुझ्याशिवाय सांग
जगू तरी मी कसा

तुझ्याशिवाय जगणे
म्हणजे अंत नसलेली वाट
चालतच रहायच
न पाहता विश्रांतीची वाट

तुझ्याशिवाय जीवनाला
जीवण कसे म्हणू
सहणच होत नाही कल्पनाही
मग तुझ्याशिवाय कसे जगू?

तुझ्याशिवाय जीवण
म्हणजे जीवण नव्हे
जीवण जगण्यासाठी
तुझ्याशिवाय मला काय हवे !
ती सोबत होती तेंव्हा
शब्द  सुचत नव्हते ,
आता ती सोबत नाही तर
शब्दान शिवाय काहीच सुचत नाही
ती जात असताना तिला
घातली मी साद रे.....
दुराव्याने अन मांडला
सलगीशी वाद रे....

होते जरी सारे खरे
तरी भासले जाळे तुला
रंगलेला आपुल्या प्रेमाचा


परी  विनंती हि
जाताना तू ऐकुनी घे...
तुझ्याजवळच्या त्या माझ्या
काळजाची काळजी घे...
........नकोस म्हणू कविता यांना
शब्दांच्या मोत्यांना आठवणींच्या धाग्यात वोवतो फक्त
........नकोस करू संग्रह यांचा
कोसलनारा पाउस हातांच्या ओंजळीत साठवतो फक्त
........नकोस छेडू मन लहरींच्या तारा
तुझविन जीवन नव्हे हृदयाची अडगळ आहे फक्त


क्षण वैरागी मनही जोगी तरी स्वप्नांचा मोह सुटेना
क्षितीजामागे मावळतांना तेजाची आरास विझेना

भास कुणाचे असे छेडती, जपलेली अधुरिशी नाती
गाव मनाचे राहून गेले, मागे सरल्या वाटेवरती
चुकले थकले प्रवास सारे, तरी पावले कुणा शोधती
हरलो आता स्वत:शी मी, अस्तित्वाचा लेश उरेना

बंद पापणी पुन्हा शोधते, क्षण काही माझे-माझेसे
स्वप्नांच्या उरल्या राखेतून, गीत तुझे अधुरे उरलेसे
दाटून आले, आठव ओले, आतून काही गहिवरलेसे
कितीच गाणी आयुष्याची, गातो मी परि सूर मिळेना
दूर राहून असली प्रेमाची परीक्षा होते हेच शास्त्र सांगते .,
स्पंदनांच्या तरंगांना ओळखणे हेच रास्त असते ।

प्रेम काय फक्त राधेचंच असत मीराच्या प्रेमाला काय प्रतच नाही ?
विरह हा अविनाशी प्रेमाची गुंतवणूक असते त्याला काय मोलच नाही ।

म्हणूनच माझ्या स्पन्दनाना तुझ्या स्पंदनाची साथ हवी आहे .
फक्त हेच तुला सांगायचं आहे ,,हेच तुला सांगायचं आहे ………।
तू भेटलीस जेव्हा
त्या जादूभरल्या क्षणांची
प्रिये याद येते
तुझ्या मिटल्या लोचनांची

याद येते मज
बरसात अनोळखी ती
अन जी स्पर्शिली मी
नक्षी तुझ्या बटांची

श्वास रोखून धरते
याद तुझ्या स्पर्शाची
ओढ मनी जागते
त्या बेधुंद मिठीची

तो वारा भरारा
ती धार श्रावणसरीची
अनुभवले सत्यात तेव्हा
याद त्या सा-या स्वप्नक्षणांची

चिंब आसमंत सारा
चिंब भावनांचा पसारा
याद छळते मजला
डोळा दाटल्या थेंबांची -- -

Tuesday, May 21, 2013

तू जेव्हाही निघतेस
माझा निरोप घेऊन
तेव्हा तुझ्या डोळ्यात
मी मला पाहतो
तू थोडं अजून
थांबावस म्हणून
तुझं मन ओळखून
हात मी धरतो
तेव्हा नजरेस नजर
तू माझ्या भिडवतेस
डोळ्यात डोळे घालून
वेड्यासारखी बघतेस
येईन रे मी पुन्हा
नजरेनच मला सांगतेस
जाऊ दे ना आता
पुन्हा भेटू म्हणतेस
मी हि सांगतो नजरेनच
चल जा आता
तेव्हा मात्र तुझे
पाऊल ना पुढे पडते
प्रत्येक वेळेस जातांना
असेच का गं घडते
तू नजरेआड होईपर्यंत
मन तुला पहात रहाते .
जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे

हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविणका अर्थ वेगळा
स्पशार्तून अंग अंग धूंद होऊ दे

पाहू दे असेच तुला नित्य हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे


नाजूक गुलाबी पाकळ्यामधून,
हलकेच ओघळताना, मधाचा,
एक थेंब दिसला!
क्षणभर मज कळेना,
आधी मध प्राशन करू,
कि पाकळ्याशी खेळू!
क्षण ओझरला, ऋतू बदलला,
पाकळ्या साऱ्या कोमेजल्या!
स्तब्ध मी, मज काही सुचेना,
आर्त स्वर एक, मनी कुजबुजला,
क्षणात मज आठवला,
मी चाखलेला, तो थेंब मधाचा!
नयनी दाटला, ऋतू एक ओघळला,
अन पाकळ्या साऱ्या फुलल्या!
क्षणभर मज कळेना,
कसे थांबवू, त्या बदलत्या ऋतूंना,
कसे साठवू, साचवू त्या थेंबांना,
मनमंदिरातल्या तळ्यांत माझ्या!
सूर्य निजला
आभाळाची चादर
झोप लागेना

नभी चांदण्या
अनं हसरा चंद्र
मन रमेना

नवच प्रेम
त्यात ही काळीराञ
बेचैन करी

कच्चाच दोर
ती आवेशानं ओढी
तिचीच ओढ

हतबल मी
असहय्य दुरावा
सूर्य उठेना

प्रेमच वेडं
वेड लावी जिवाला
मीच शहाणा
माझे एक आर्जव तू मूकपणे ऐकून घे,
तव हृदयी थोडी तरी जागा तू मला दे!
प्रेमात या चिंब, धुंद झाले रे मन माझे,
फक्त त्याला आता तव स्नेहाचा एक धागा दे!
आयुष्याचे शिल्प हे कधीच तयार आहे रे माझे,
फक्त आता त्याला तुझ्या मैत्रीचा एक स्पर्श दे!
तुजसवे जगण्या अधीर होते मन हे माझे,
बस - त्यासी तुझकडील थोडासा हर्ष दे!
चिंब पाऊस
गार वारा
त्यात तुझ्या
नयन तारा
आपण दोघे
कुणीच नाही
मिठीत तुझ्या
सारे काही
डोळे बंद
सारे शांत
दूर दूरवर
बस एकांत
ओठ तुझे
ओठ माझे
तुझ्या श्वासांत
श्वास माझे
एक क्षण
एक जन्म
तूच आहेस
माझे विश्व...
माझे विश्व...
शब्दात बांधू कैसी ही भावना मनीची

मी वाट पाहताहे तू साद घालण्याची

अवचित येउनिया मजला मिठीत घ्यावे

गुंतुनिया तुझ्यात मी प्रणयात दंग व्हावे

हे स्वन लोचनाचे ही भावना उरीची

होताच स्पर्श तुझा लाजाळू मीच व्हावे

रंगूनी गुगूनी मी तुझ्यात विरघळावे

हे स्वन सत्य व्हावे ही आस अंतरीची
हा खेळ भावनांचा नेहमी खेळत असतो मी
मनी आठवत असतो तिला, मनात खपून असतो मी ..

शब्द ओठांवरचे माझे, नेहमी जपून असतो मी
माझ्या भावनांमध्ये तिला नेहमी लपवून असतो मी ..

तीन याव आठवणीत माझ्या नकळत हसाव लाजून मी
भाव बदलावे चेहऱ्यावरचे माझे, खळी बनून जावे मी ..

मग पहावे तिला आरश्य मध्ये आणि रुसून जाव मी
तीन खेळाव नजरे सोबत माझ्या, न् मग हसून जाव मी ..
तुझा स्पर्श..
मनमोहक क्षणांना स्वप्नातीत साठवत नेणारं,
अतिशय निर्मळ असं काही.. मनाच्या देव्हाऱ्यात जपलेलं
तुझं माझं स्वप्न
टपोऱ्या डोळ्यात दाटलेलं
कसलीशी शपथ मागणार..
आणि हातात हात घेऊन डोळ्यात हसलेलं,
स्वप्न.. तुझं माझं
तुझं हसणं, मोत्यांच्या माळेचं बरसणं
गालावरची खळी
अन ओठांवर फुललेली नाजुकशी लाल कळी
आणि इथेच राहून जावं आता मग,
तुझ्या शुभ्र छायेखाली
केसांच्या गाभाऱ्यात ऊर भरत राहावं
आणि आयुष्य सरून जावं..
जणू मिटल्या पापण्यात भर दुपारी स्वप्न पडून जावं,
एक सुंदर स्वप्न..
तुझं माझं भेटणं इतकं सहज असावं..
इतकं सुंदर असावं..
तू भेटलीस जेव्हा
त्या जादूभरल्या क्षणांची
प्रिये याद येते
तुझ्या मिटल्या लोचनांची

याद येते मज
बरसात अनोळखी ती
अन जी स्पर्शिली मी
नक्षी तुझ्या बटांची

श्वास रोखून धरते
याद तुझ्या स्पर्शाची
ओढ मनी जागते
त्या बेधुंद मिठीची

तो वारा भरारा
ती धार श्रावणसरीची
अनुभवले सत्यात तेव्हा
याद त्या सा-या स्वप्नक्षणांची

चिंब आसमंत सारा
चिंब भावनांचा पसारा
याद छळते मजला
डोळा दाटल्या थेंबांची -- -
कधी कधी असाच एकांतात
तुझी आठवण करत
तुझी कल्पना करत राहतो
कल्पनेच्या महासागरात असाच डुंबत राहतो
तरीही थांग लागत नाही की
तु आहेस तरी कोण...
असे वाटते तुझ्या खोल खोल डोळ्यांत
स्वतःला झोकून द्यावे
क्षणाभारसाठी सर्व विसरून ह्या
देहापासूनच वेगळे व्हावे
खुपदा प्रयत्न केला तरी
अजूनही कळत नाही की
तु आहेस तरी कोण...
आज पर्यंत कितीतरी जण
आयुष्यात आले आणि कितीतरी परत गेले
पण तु नसताना क्षणभरासाठीही
तुझी आठवण मनातून जात नाही
माझे तर सोड ह्या मनालाही उमगत नाही की
तु आहेस तरी कोण...
चौर्याऐशी योनींतून मानव म्हणून जन्मलो
कुणास ठाऊक किती वेळा जगलो मेलो
हेही शोधायला असेल सोपे पण
सर्वथा कठीण वाटते जाणणे की
तु आहेस तरी कोण...
तु कधी स्वताकडे पाहा एकदा
म्हणजे तुला पटेल माझे म्हणणे
की एकमेकांवाचून अपूर्ण आहे आपले जगणे
साद घालतोय मी तुला आता तूच सांग मला की
तु आहेस तरी कोण...
तु आहेस तरी कोण...
अशी सांज येते,
तशी ती जाते.
जाता जाता लवलवत्या पापण्यांनी
माझ्या हृदयाची कंपने वाढवते .

अशी सांज येते,
भास्करा क्षितिजा पार घेऊन जाते.
तो जाता जाता ती त्याच्या किरणात न्हाऊन निघते .

तिच्या पाठमोऱ्या सावलीकडे मी पाहतो,
तिने पुन्हा फिरून माघे यावे ,
मला बिलगावे अशी आस धरून बसतो.

अशी सांज येते ,
वेळ पुन्हा कातर ,कातर होते.
तिचे हि पाऊल पावलात घुटमळते .
मागे वळून तिची नजर मला शोधत राहते .

मी दिसता तशी ती धावत येते ,
नाजराला नजर भिडते.
आमच्या श्वासाची घालमेल ,
त्या सांजेला ला कळते .

अशी सांज येते ,
ती माझ्या मिठीत असते ,
शब्दांना जागा नसते ,
मात्र अश्रूंना वाट मिळते .

ओघळता तिचे अश्रू ,
ती सांज हि रडते ,
म्हणून कदाचित ती पावसाला हाक मारते .

तो गडगडून येतो ,
सार काही भिजून टाकतो .
मी मात्र तिच्या डोळ्यातल्या काळ्या ढगाकडे बघता ओलाचिंब होतो.
तुझी नजर
जीवघेणी
जशी नशीली
काजू फेणी

तुझी नजर
मधाळ
एका कटाक्षात
करी घायाळ

तुझी नजर
वेड लावी
माझ्या काळजाचा
ठोका चूकवी

तुझी नजर
जीव घेई
त्यात माझी
प्रीत पाही

तुझी नजर
मन हरवी
दिसे प्रेमाची
मज पालवी .


तुझा सुंगंध जसा मोगरयास ही फिके पाडतो

म्हणूनच तर मन माझे तुझ्याच भोवती फिरतो

पण जेव्हा

माझ्या मिठीत येतेस

प्रेमाचा रंग बघ कसा अजून खुलतो

Monday, May 20, 2013

राणी I Miss U SO much




I don't need a diamond ring.
I don't need the best chocolates.
I don't need the most expensive fresh
flower.

But all i need is...

Your love.

Your care.

Your time.

And most importantly I need you....




This is for you Sweetheart♥
I luv my eyes when u look into them,
I luv my name when u say it,
I luv my heart when u luv it,
I luv my life when you are in it 




"Perfect love is not in
Phone calls or in
Text msgs
It is the silent smile from
Your heart . .
when you think of
Your loved onces"


"Every One Has A 'Best friend'
During Each Stage Of Life"


But

Only Lucky Ones Have The
Same
Friend In
All Stages Of Life".




People say,
When you are in love everything seems beautiful
But I say,
When You are truly in love
You cant find anything more beautiful
Than your LOVE".*♥






हवी आहेस तू...
पावसात भिजताना
मला तुझा आडोसा द्यायला
माझ्यासवे चिंब होऊन
मिठीत शिरायला..
हवी आहेस तू..
माझ्या कुशीत राहून
रात्रभर चांदण्या मोजायला
"चंद्र सुंदर कि मी..??"
असे वेडे प्रश्न विचारायला..हवी आहेस तू..
रात्रीचे आभाळ उराशी घेऊन
चांदण्या तुझ्या केसात माळायला
माझ्या मिठीचे मऊ मखमल पांघरून
गुलाबी थंडीच्या रात्रीला
हवी आहेस तू..
तुला पाहण्या जीव आसुसलाय
नजर लावून बसलोय जिथे
एकदा येउन बघ त्याच वाटेला
त्या वात बघणा-या
वेड्या मनाला समजवायला
हवी आहेस तू..♥♥





कधीतरी असेच
भरून येते मनांतरी
जरी कळत नसले
जीव जळतो अंतरी
अशावेळी वाटते
असावे कुणीतरी
नाही जरी जवळ
दूरवरच कुठेतरी
मन विचार करते
कुणीतरी आठवतेपण
सारखी तुझीच छबी
मनामध्ये अवतरते
मनाची समजूत
मनच काढू शकते
प्रेमाची ओळख
प्रेमच करू शकते
पाहुनी स्वप्नी तुला
वेळ तर जातो
पण कुठल्यातरी विचाराने
जीव सतत जळतो
नाती मनात ठेऊन
फक्त जगता येते
पण जगणारा मात्र
रोज रोज मरतो
आता स्वप्नांत जगणे नको
जीवनात तु यावीस
नको स्वप्न तुझे
फक्त तु हवीस
फक्त तु हवीस.
 




येईल ती मलाच शोधत
घेईल माझा हातात हात
म्हणेल तूच आहेस माझा यार
तुझ्याविना सगळे बेकार
हवी आहे मला साथ तुझी
मी आहे फक्त आणि फक्त तुझी
हात पुढे करेन
मग मी म्हणेन
येना माझ्या पाखरा
तुझ्याविना मी अधुरा..♥♥





तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना, जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..
सकाळचा नाश्ता करताना असो किंवा संध्याकाळचाचहा पिताना..
drive करत्ताना असो किंवा मी meeting मध्ये असताना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..
येतोस तू हळूच आणि शिरतोस माझ्या मनात.. नाही कळत तुला आता वेळ कुठली आणि आत्ता महत्वाचे काय..
घेरतोस मला तुझ्या धुंद मिठीत.. आणि होते सगळे अवघड स्वताला सावरताना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..
तू असलास कि उरत नाहीत कुठल्याच अडचणी.. सगळी संकटे जातात पळून..
घेते मी ओढून बेभान आशेच्या पंखांना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..
तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना, जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..





तुझ्याशी बोलताना,
मी तुझ्या डोळ्यात पाहतो,
फक्त मीच त्या पाण्यात नाहतो.
जेव्हा पापणी लवते,
त्याच पाणी रूपात तुझ्या ओठी येतो,
हळूच ओठ पाणीदार होतात,
मग त्याच ओठांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.
त्याचवेळी तू मला अडवतेस,
अडवताना लाजतेस,
थोडी दूर जातेस, पण नंतर हातात हात धरतेस,
मग हीच लाज माझी धिटाई बनते.
जेव्हा मी घरी जाण्यास निघतो,
तेव्हा तुझ्या चेहरयावरचे हास्याच गमावते,
मग ते परत आणण्यासाठी तुला भेटण्याचे वचन देतो,
आणि त्या क्षणाची आठवण घेऊन अश्रू सावरतो.




"Chehre par marne wale hajar mil jayenge,
Kuch log har jarurat puri kar janenge,
Khawahish hai uski jo dil se samjhe hame,
Humto jindgi bhi uske naam kar jayenge…






तुझं दबक्या पावलांनी येणं
आणि माझे डोळे मिटणं मला नित्याचं झालंय
तुझ्या ड्रेसचा रंग माहीत असूनही
खोटं बोलणं माझ्या सरावाचं झालंय
तुझ्या नखरेल घुश्श्या पुढे
माझं हृदय नेहमीच हरलंय
उगाच का लाखातून हृदयाने
तुलाच एकटीला वरलंय
सारं जग म्हणतय मला
’तुझ्या डोक्यात प्रेमाचं
खूळ भरलंय’नाही कळायचं त्यांना
सारं शहाणपण जाऊन
आता नुसतं प्रेम प्रेम उरलंय. .





आपल्या आयुष्यात काही सुंदर क्षणामुळे 

आपले जिवन सुंदर होते,

पिंपळाच्या पानाची कितीही जाळी झाली 

तरी आपण जिवापार जपून ठेवत असतो 

त्याप्रमाणे काही क्षण आपल्या हृदयात 

जपून ठेवलेले असतात.आणि कधीतरी काही हरवल्या सारखे वाटते

प्रिये तुझ्या इच्छेसाठी
तुटलाय ग तो तारा.

तुझ्या सोयीसाठी
सुटलाय ग हा बेधुंद वारा

तुझ्या आनंदासाठी
चांदण्याचा हा मोर पिसारा

तुझ्या झोपेसाठी
चंद्र जागतो आहे बिचारा

तुझ्याचसाठी
खेळ मांडला हा सारा.

फक्त तुझ्यासाठी …


1