NiKi

NiKi

Tuesday, May 21, 2013

सूर्य निजला
आभाळाची चादर
झोप लागेना

नभी चांदण्या
अनं हसरा चंद्र
मन रमेना

नवच प्रेम
त्यात ही काळीराञ
बेचैन करी

कच्चाच दोर
ती आवेशानं ओढी
तिचीच ओढ

हतबल मी
असहय्य दुरावा
सूर्य उठेना

प्रेमच वेडं
वेड लावी जिवाला
मीच शहाणा

No comments:

Post a Comment