NiKi

NiKi

Monday, May 27, 2013

स्वप्नात माझ्या काल एक आली होती परी..
स्वप्नात माझ्या काल एक आली होती परी..
तिला मी म्हणालो परी, तू ये ना माझ्या घरी..

घर माझं छोटसंच पण आहे टुमदार,
स्वच्छ परिसर अन सुंदर आवार,
स्वर्गच आहे जणू हा भूमीवरी..
तिला मी म्हणालो परी, तू ये ना माझ्या घरी..

घरी तुझ्या ओळखीचे एक 'चित्र',
ते माझे बाबा होते ग माझे मित्र,
आले आहेत स्वर्गात ते परी तुझ्याच घरी..
तिला मी म्हणालो परी तू ये न माझ्या घरी..

आई माझी तुझ्यासारखीच एक परी,
तू स्वप्नातली पण ती आहे खरी,
खूप माया करते ती माझ्यावरी..
तिला मी म्हणालो परी तू ये न माझ्या घरी..

माझी एक ताई, माझा एक भाऊ,
त्यांच्या गुणांचे मी किती गुण गाऊ,
ओझे माझे नेहमी त्यांच्या खांद्यावरी..
तिला मी म्हणालो परी तू ये न माझ्या घरी..

घरात माझ्या आहे एकच कमी,
हृदयाची खोली अजून रिकामी,
काळजाची जागा घेईल कुणीतरी..
तिला मी म्हणालो परी तू ये न माझ्या घरी..

परी मला म्हणाली, मी तुझ्या घरी निघाली..
मग क्षणार्धात ती परी माझ्या घरी अवतरली..
खोटे नाही सांगत कहाणी आहे ही खरी..
ही पहा ती परी जी आली माझ्या घरी.
..

No comments:

Post a Comment