NiKi

NiKi

Wednesday, May 22, 2013

........सात जन्माची त्याची सोबत...राहू दे
आठवा जन्म मात्र मला ...नक्की दे

वाट पाहीन आणखी सहा जन्म
तेंव्हाचे वचन मात्र मला ...नक्की दे

तू सांगशील तेथेच जन्म घेईन
शहराची ओळख पूर्वी ...नक्की दे

रंग रूप सजवीन,अडका खूप कमवीन
मनातले भाव न हाव मात्र ...नक्की दे

आवडेल ते साठवेल पुन्हा पुन्हा
आवडीतला ठाव मात्र ...नक्की दे

मी हि वागेल मनकवडा सद्दैव
सात जन्मी मनी राहशील वचन एवढे ...नक्की दे

No comments:

Post a Comment