NiKi

NiKi

Monday, May 27, 2013

तिच्या प्रीतीमुळे.
गंधीत आसमंत हे दरवळली होती फ़ुले
बहरात जिंदगी होती त्या तिच्या प्रीतीमुळे.

क्षितीजावर उधळी सांज रंगसंगती
त्या रंगात भिजत होती अपुली प्रीती
रंगीन स्वप्न होती रंगीत ती होती पळे.

अंधार दाटलेली जरी रात होती
तरी मनी नव्हती अंधाराची भीती
फ़ुलूनी नभी येती तेव्हां चांदण्यांचे मळे.

आज मला जग वैराण माळ वाटे
बहरात अता फ़ुलूनीच येती काटे
रिमझिम ही श्रावणाची भरी आसवांचे तळे............

No comments:

Post a Comment