NiKi

NiKi

Monday, May 20, 2013


तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना, जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..
सकाळचा नाश्ता करताना असो किंवा संध्याकाळचाचहा पिताना..
drive करत्ताना असो किंवा मी meeting मध्ये असताना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..
येतोस तू हळूच आणि शिरतोस माझ्या मनात.. नाही कळत तुला आता वेळ कुठली आणि आत्ता महत्वाचे काय..
घेरतोस मला तुझ्या धुंद मिठीत.. आणि होते सगळे अवघड स्वताला सावरताना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..
तू असलास कि उरत नाहीत कुठल्याच अडचणी.. सगळी संकटे जातात पळून..
घेते मी ओढून बेभान आशेच्या पंखांना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..
तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना, जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..




No comments:

Post a Comment