NiKi

NiKi

Thursday, May 30, 2013

जी माणसे हवीशी वाटतात
ती माणसे भेटत नाहीत
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नको असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काल संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो
तेव्हा काल संपलेला असतो
नशीब हे असच असत
त्याच्याशी जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते

No comments:

Post a Comment