NiKi

NiKi

Tuesday, May 21, 2013

तुझा स्पर्श..
मनमोहक क्षणांना स्वप्नातीत साठवत नेणारं,
अतिशय निर्मळ असं काही.. मनाच्या देव्हाऱ्यात जपलेलं
तुझं माझं स्वप्न
टपोऱ्या डोळ्यात दाटलेलं
कसलीशी शपथ मागणार..
आणि हातात हात घेऊन डोळ्यात हसलेलं,
स्वप्न.. तुझं माझं
तुझं हसणं, मोत्यांच्या माळेचं बरसणं
गालावरची खळी
अन ओठांवर फुललेली नाजुकशी लाल कळी
आणि इथेच राहून जावं आता मग,
तुझ्या शुभ्र छायेखाली
केसांच्या गाभाऱ्यात ऊर भरत राहावं
आणि आयुष्य सरून जावं..
जणू मिटल्या पापण्यात भर दुपारी स्वप्न पडून जावं,
एक सुंदर स्वप्न..
तुझं माझं भेटणं इतकं सहज असावं..
इतकं सुंदर असावं..

No comments:

Post a Comment