NiKi

NiKi

Tuesday, May 21, 2013

शब्दात बांधू कैसी ही भावना मनीची

मी वाट पाहताहे तू साद घालण्याची

अवचित येउनिया मजला मिठीत घ्यावे

गुंतुनिया तुझ्यात मी प्रणयात दंग व्हावे

हे स्वन लोचनाचे ही भावना उरीची

होताच स्पर्श तुझा लाजाळू मीच व्हावे

रंगूनी गुगूनी मी तुझ्यात विरघळावे

हे स्वन सत्य व्हावे ही आस अंतरीची

No comments:

Post a Comment