NiKi

NiKi

Thursday, May 23, 2013

निमुळदार हनुवटी
शुभ्र मोत्यांची पंगती,
त्यावर ओठांची फुल पाकळी

खळाळत हास्य..
अन गालांवर अल्लड खळी
जोडणारी त्याला सुबक
दोन कानाची कोयरी

सरळ धारधार नाक
शेजारच्या खोबणीत
टपोऱ्या डोळ्यांचा धाक

त्यावर भुवयांचा धन्युष
त्यात नजरेचा बाण

उंच भाळ त्यावर केशा ची नक्षी
मधोमध भांगात कुंकवाची लाली
चेहऱ्यावरची ओळख, मात्र तीच नवी जुनी

No comments:

Post a Comment