NiKi

NiKi

Monday, May 27, 2013

पावसाचे प्रेम..
प्रेमातला पाउस..
आतुर ओढीने
कसे तुला सांगू ग...

एकमेकांच्या मिठीत
चिंब त्यांचे भिजने..
अंग अंग त्यांचे शहारले
कसे तुला सांगू ग...

बहरल्या वसंतात
बहरतो प्रेमाचा मळा
लाल गुलाबी फुलांची
लाल गुलाबी प्रीत..
कसे तुला सांगू ग...

स्वप्नातल्या कळीचे
हळूवार लाजून उमलने..
गुलाबी गुलाबी ओठांचे
मादक ते हसने..
कसे तुला सांगू ग...

चिंब पावसात
चिंब तू चिंब मी..
चिंब बरसतो एकमेकांवर..
चिंब प्रेमाची चिंब कहाणी
कसे तुला सांगू ग...

चिंब भिजून..
लाजली तुझी काया..
लाजलेल तुला पाहून
मदमस्त माझे तारुण्य
कसे तुला सांगू ग...!!!

No comments:

Post a Comment