NiKi

NiKi

Thursday, May 30, 2013

चिंब भिजलेली रात्र.........
चिंब भिजलेली एक रात्र
अजुनही निजली नाही
तुझ्या आठवणींची एक सर
अजूनही सरली नाही
किती वारे आले अन्गेले कितीतरी तुझ्या श्वासाने दरवळलेली एक झुळुक
अजूनही विरली नाही
शिंपडू देत मनसोक्त आज मला
माझीच आसवे
तुझ्या विरहाची अग्नी
अजूनही शमली नाही

No comments:

Post a Comment