NiKi

NiKi

Wednesday, May 29, 2013

एक शब्द
तुझ्या हसण्याचा
ओठी माझ्या....
एक शब्द
तुझ्या फुलांचा
नसानसात माझ्या..
एक शब्द
तुझ्या प्रेमाचा
मनात माझ्या..
एक शब्द
तुझ्या रात्रीचा
स्वप्नात माझ्या..
एक शब्द
तुझ्या रूपाचा
डोळ्यात माझ्या..
एक शब्द
तुझ्या इशार्याचा
काळजात माझ्या..
एक शब्द
तुझ्या सहवासाचा
कवितेत माझ्या..

No comments:

Post a Comment