NiKi

NiKi

Thursday, May 23, 2013



मिठीत येता सखया सरली अवघी भाषा
ओठांवर ओठांची उरली एकच भाषा

मिठीत येता सर्वांगावर काटा फुलला
हुरहुर कसली, ओढ अनामिक नकळे मजला

मिठीत येता नेत्र सहज ते मिटून गेले
स्वर्गसुखाला नजर न लागो समजुन गेले

मिठीत येता काया अवघी ये घामेजुनी
दंवबिंदू लेवून थरथरे मुग्ध कमलिनी

मिठीत येता मनामनाची हो समरसता
जाणिव संपुन व्यापुन राही एक तृप्तता

मिठीत येता माझे मीपण संपून गेले
मी-तू पणही गेले आता सुखचि उरले

मिठीत येता आवेगातच घडले सारे
स्वप्न म्हणू की स्वर्गसुखाचे असे पिसारे ......

No comments:

Post a Comment