कधीतरी असेच
भरून येते मनांतरी
जरी कळत नसले
जीव जळतो अंतरी
अशावेळी वाटते
असावे कुणीतरी
नाही जरी जवळ
दूरवरच कुठेतरी
मन विचार करते
कुणीतरी आठवतेपण
सारखी तुझीच छबी
मनामध्ये अवतरते
मनाची समजूत
मनच काढू शकते
प्रेमाची ओळख
प्रेमच करू शकते
पाहुनी स्वप्नी तुला
वेळ तर जातो
पण कुठल्यातरी विचाराने
जीव सतत जळतो
नाती मनात ठेऊन
फक्त जगता येते
पण जगणारा मात्र
रोज रोज मरतो
आता स्वप्नांत जगणे नको
जीवनात तु यावीस
नको स्वप्न तुझे
फक्त तु हवीस
फक्त तु हवीस.

No comments:
Post a Comment