तुझं दबक्या पावलांनी येणं
आणि माझे डोळे मिटणं मला नित्याचं झालंय
तुझ्या ड्रेसचा रंग माहीत असूनही
खोटं बोलणं माझ्या सरावाचं झालंय
तुझ्या नखरेल घुश्श्या पुढे
माझं हृदय नेहमीच हरलंय
उगाच का लाखातून हृदयाने
तुलाच एकटीला वरलंय
सारं जग म्हणतय मला
’तुझ्या डोक्यात प्रेमाचं
खूळ भरलंय’नाही कळायचं त्यांना
सारं शहाणपण जाऊन
आता नुसतं प्रेम प्रेम उरलंय. .

No comments:
Post a Comment